नगरपरिषद बचत भवन पांढरकवडा येथे कोविड-१९ लसीकरण


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२ आक्टो.) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात नगरपरिषद बचत भवन येथे मोफत (कोविड-१९) लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आले.वय १८ ते ४४ वय ४४ ते ६० वयापर्यंत पहिल्या व दुसऱ्या डोसांचे नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार नागरिकांना सोशल डिस्टन्स व मास्क घालून कोरोनाचे नियम पाळुन कोरोनावर सरसकट मात करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांना कॉविसील्ड आणि कोवैक्सिन लस देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा अंतर्गत एकूण ९० लस नागरिकांना देण्यात आले. लसीकरण मोहिमेत मेडिकल ऑफिसर डॉ.शंकर मिंदेवार, सिस्टर सौ. पि.जी.मेश्राम, ऑपरेटर श्री.निलेश प्रधान यांचे सहकार्य लाभले.
नगरपरिषद बचत भवन पांढरकवडा येथे कोविड-१९ लसीकरण नगरपरिषद बचत भवन पांढरकवडा येथे कोविड-१९ लसीकरण Reviewed by सह्याद्री चौफेर on October 02, 2021 Rating: 5
Powered by Blogger.