सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१९ ऑक्टो.) : दोन कुटुंबीयांमध्ये सुरु असलेला वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाद विवादात अश्लील शब्दांची ठिणगी पडल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी परस्परांना चांगलेच बदडले. दोन कुटुंबाच्या वादात नातेवाईकांना व परिचयातील लोकांना सभागी करून त्यांच्या साहाय्याने एकमेकांना लाठीकाठीने व लाथा बुक्याने जबर मारहाण करण्यात आली. दोन्ही कुटुंबातील महिलांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हे दाखल केले आहे. हि घटना काल १८ ऑक्टोबरला रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास घडली शहरातील रंगनाथ नगर येथे राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये मागील काही दिवसांपासून वादाच्या ठिणग्या उडत होत्या. अश्लील शिवीगाळ करण्यापासून तर मारहाणीच्या धमक्या देण्यात येत होत्या. एका कुटुंबाची दुसऱ्या कुटुंबाशी शाब्दिक चकमक उडायची, तर दुसऱ्या कुटुंबाचा उसनवारीचे पैसे मागण्यावरून वाद व्हायचा. दोन्ही कुटुंबामध्ये मागील काही दिवसांपासून चांगलेच खटके उडत होते. १८ ऑक्टोबरला दोन्ही कुटुंब एकमेकांशी भिडले. सोबत नातेवाईक व परिचयातील लोकांनाही बोलावून घेतले. एकमेकांना लाठीकाठी व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याबाबत दोन्ही कुटुंबातील महिलांनी एकमेकांविरोधात तक्रारी नोंदविल्या. तेजस्विनी गोपाल झाडे (२६) यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचा गणेश अरविंद पुसनाके (३६) व त्यांची पत्नी आरती पुसनाके यांच्याशी १७ ऑक्टोबरला वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून गणेश पुसनाके याने तेजस्विनी झाडे यांचे भासरे गौतम झाडे याला कॉलर पकडून नविन अग्निशमन दलाच्या इमारतीजवळ ओढत नेत लाठीकाठी व लाथाबुक्याने जबर मारहाण केली. तेजस्विनी व त्यांचे पती गोपाल झाडे यांनी गौतम झाडे यांना आरोपीच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता झाडे पती पत्नीलाही आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. गौतम झाडे यांना जबर मार लागल्याने त्यांना आधी ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूरला हलविण्यात आले. पोलिसांनी तेजस्विनी झाडे यांच्या तक्रारी वरून गणेश अरविंद पुसनाके(३६), अजय राऊत (२३), राधा रवी गुप्ता (२८) सर्व रा. रंगनाथ नगर यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, २९४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तसेच आरती गणेश पुसनाके (२९) यांच्या तक्रारी नुसार त्यांच्या पतीचे पांढरकवडा येथे गॅरेज आहे. ते महिन्यातून दोन तीन वेळाच घरी येतात. त्यांनी राम दशरथ देठे याला २० हजार रुपये उसने दिले होते. उसनवारीने दिलेले पैसे मागण्यावरून गणेश पुसनाके याच्याशी आरोपींचा वाद सुरु आहे. १७ ऑक्टोबरला गणेश पुसनाके यांनी उसने दिलेले पैसे मागितल्याने त्यांच्याशी राम देठे व गौतम देठे यांची शाब्दिक चकमक झाली. वादविवादात अशील शब्दांची ठिणगी पडल्याने वाद चांगलाच विकोपाला गेला. त्यानंतर राजू चापाडे याने गणेश पुसनाके यांना महत्वाचं बोलायचं आहे, म्हणत नविन अग्निशमन दलाच्या इमारती जवळ नेले. तेथे आधीच काही आरोपी दबा धरून बसले होते. गणेश पुसनाके यांना आरोपींचा घोळका दिसतातच त्यांनी पत्नीला फोन लाऊन तेथे येण्यास सांगितले. पत्नी काही नातलग व परिचितांना घेऊन घटनास्थळी आली असता आरोपी गणेश पुसनाके याला लाकडी दांड्याने मारहाण करीत होते. पत्नीने कसे बसे पतीला आरोपीच्या तावडीतून सोडविले, व पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरती गणेश पुसनाके यांच्या तक्रारी वरून राम दशरथ देठे (३५), गौतम झाडे (४०), समिर मेश्राम (३०), गोपाल झाडे (३२) सर्व रा. रंगनाथ नगर यांच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एएसआय डोमाजी भादिकर करित आहे.
जुन्या वादविवादातून दोन कुटुंबांमध्ये झाला राडा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 19, 2021
Rating:
