सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (१४ ऑक्टो.) : जुन्या भांडणाच्या रागातून एका युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील दि.११ रोज सोमवारी रोजी ११:३० च्या दरम्यान घडली होती. जखमी झालेल्या युवकावर मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मेडिकल कॉलेज यवतमाळ उपचारासाठी दाखल करणाचा सल्ला दिला होता. यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल करून संजय वाढई यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू होते. बुधवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू त्याचा झाला आहे. मृत व्यक्तीच्या वडीलांनी फिर्यादीवरून दोघा जणाविरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, दि.११ ऑक्टोंबर रोज सोमवार रोजी रात्रीच्या साडे अकराच्या दरम्यान किरण उर्फ हर्षल धनराज लालसरे, निखिल धनराज लालसरे या दोघा विरोधात संजय लक्ष्मण वाढई या २६ वर्षीय युवकासोबत किरण उर्फ हर्षल लालसरेशी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढत घरा जवळ भांडण सुरु केले. यावेळी संजय वाढई यास लाथाबुक्क्यांनी व पोटावरची अवघड जाग्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. दरम्यान जखमी संजय यास मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याची गंभीर परिस्थिती पाहता त्यास यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. यवतमाळ येथे तीन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.
आज बुधवार रोजी त्याची प्रकृती अवघड जागेला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यूस जबाबदार असणाऱ्या हल्लेखोर किरण उर्फ हर्षल लालसरे, निखिल लालसरे (राहणार प्रभाग क्रमाक आठ) इंदिरानगर या दोघां विरोधात मृतक यांचे वडील लक्ष्मण वाढई यांनी बुधवार दि. १३ रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या दोन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार आनंद आचलेवार हे तपास करत आहेत.
मारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2021
Rating:
