चंद्रपूर मेडिकल अग्नीकांड: यंग ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर यांनी दिली घटनास्थळी भेट


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (७ ऑक्टो.) : चंद्रपूर येथील बायपास मार्गावरील पागल नगर येथे बांधकाम सुरु असलेल्या मेडिकल काँलेजला मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागुन अनेक कामगारांचे आर्थिक नुकसान झाले. साेबतच त्यांचे कडील महत्वांच्या कागदपत्रांची भीषण आगीत राखरांगाेळी झाली. विदर्भात सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणां-या चंद्रपूर शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर व महिला कार्यकर्त्यांनी काल बुधवार दि.६ ऑक्टाेंबरला या घटनास्थळला भेट देवून तेथील पिडीत कामगारांची परिस्थिती जाणून घेतली त्या नंतर तेथील कंपनीच्या मँनेजरशी चर्चा करुन त्या पिडीत कामगारांना तातडीने आर्थिक मदत देण्यांची मागणी केली.

या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या रुपा परसराम, आशा देशमुख, दुर्गा वैरागडे, मिनाेती बैरागी, सविता दडांरे आदीं प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. दरम्यान चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांनी केलेल्या सुचनेच्या अनुषंगाने शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी तथा कार्यकर्त्यांनी तातडीने भेट देवून तेथील पिडीत कामगारांची भाेजनाची व राहण्यांची व्यवस्था केली आहे.

यंग चांदा ब्रिगेड आदिवासी संघटनेचे युवा नेते जितेश कुळमेथे व त्यांचे काही कार्यकर्त्यांनी काल या घटनास्थळाला भेट देवून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सदरहु प्रतिनिधीने रात्री त्यांचेशी भ्रमनध्वनी वरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचेशी संपर्क हाेवू शकला नाही.
चंद्रपूर मेडिकल अग्नीकांड: यंग ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर यांनी दिली घटनास्थळी भेट चंद्रपूर मेडिकल अग्नीकांड: यंग ब्रिगेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर यांनी दिली घटनास्थळी भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on October 07, 2021 Rating: 5
Powered by Blogger.