सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२४ ऑक्टो.) : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य लोकांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. पेट्रोल डिझेल खाद्य तेल भाज्या नंतर आता काडी पेट्याच्या किंमती वाढणार आहेत. तब्बल चौदा वर्षा नंतर वर्षा नंतर काडीपेट्यांच्या किंमती वाढल्या आहे. याआधी २००७ मध्ये साली काडीपेट्यांच्या दरात वाढ झाली होती. कच्चा मालाच्या वाढत्या किंमतीमुळे ही वाढ करण्यात येत असल्याचे उद्योगाच्या प्रतिनिधी म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडिया च्या वृत्ता नुसार १ डिसेंबर पासून सामान्यांची किंमत एक रुपयांनी वाढेल.या वाढी नंतर काडीपेट्यांची नवीन किंमत एक रुपयांने वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेस च्या बैठकीत घेण्यात आला.पाच प्रमुख मॅच बॉक्स उद्योग संस्थेचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होते.
काडीपेट्यांची किंमत वाढवण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला आहे. या वाढीचे कारण कच्चा मालाच्या किंमती वाढल्याचे सांगितले जात आहे. मुख्यत: लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड ई. या सर्व कच्चा मालाचे भाव वाढले आहेत. किंबहुना डिझेल च्या किंमतीत वाढ झाल्यामुळे वाहतुकही महाग झाली आहे. यामुळेच कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत.
महागाई चा भडका तब्बल १४ वर्षांनी काडीपेट्यांची किंमतीही वाढली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
