खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (१३ ऑक्टो.) : नवरात्री उत्सवानिमित्याने जागृत जगदंबा संस्थान केळापूर येथे चंद्रपूर आर्णी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भेट देऊन आई जगदंबे मातेचे दर्शन घेतले. यावेळी जगदंबा संस्थानात खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शंकर बडे, विजय पाटील, गजानन बेजंकीवार, अमर पाटील, रवि बोरेले, जितेंद्र कोंघारेकर, श्रीनिवास नालमवार, मनोज भोयर, विष्णू राठोड, बिशनसिंग शिंदो, ईक्राम अली, अवि पाटील, प्रेम राठोड उपस्थित होते. तसेच पांढरकवड्यातील विविध दुर्गोत्सव मंडळाला खासदार धानोरकर यांनी भेटी दिल्या.
खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट खासदार बाळू धानोरकर यांची केळापूर जगदंबा संस्थाना भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on October 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.