सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (१३ ऑक्टो.) : सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ पांढरकवडा तर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केले जाते.परंतु मागील वर्षां पासून कोरोना महामारी रोगाचा प्रादुर्भाव भारता बरोबरच पांढरकवडा शहरातही वाढत असल्याने शांतता पूर्वक शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती प्रमाणे दुर्गोत्सव साजरा केल्या जात आहे.
कोरोना महामारी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन व शासनाच्या वतीने महाराष्ट्रभर कोरोना लसीकरण भरपूर प्रमाणात केले जात आहे. त्यातच नवरात्र उत्सवा दरम्यान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ राम मंदिर रोड पांढरकवडा च्या वतीने शासनाने घालून दिलेल्या अटी,शर्ती प्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करत सामाजिक कार्यावर भर देत लसीकरण शिबिराचे आयोजन केले गेले.
या लसीकरण शिबिरामध्ये जवळ पास 110 नागरीकांनी सहभाग घेत लसीकरण शिबिराला प्रतिसाद दिला.यावेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तोडसे सर, डॉ. सातुरवार मॅडम व पी.जी.मेश्राम आरोग्य सेविका, तसेच न.प. चे कर्मचारी यांनी सेवा बजावली या शिबिरासाठी सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.
सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ पांढरकवडा येथे लसीकरण शिबिर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2021
Rating:
