सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
केळापूर, (२७ ऑक्टो.) : "केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी फुलले आहे. त्यांचे मुख्य आकर्षण आहे येथील व्याघ्र दर्शन. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या संख्येने आहेत. तसेच वाघाचे दर्शनही हमखास होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे."
पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे अभयारण्यातील पायावाटा पुसल्या जातात; तसेच गाड्या चिखलात रुतण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अभयारण्ये पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला होता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात टीपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी बंद करण्यात आली होती.
टीपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची सफारी वाढल्याने पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पांढरकवडा वन विभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १९ ऑक्टोबर रोजी टीपेश्वर अभयारण्याचे सुन्ना गेट व माथणी गेट उघडण्यात आले असुन पर्यटकांसाठी सफारी सुरू करण्यात आली आहे. टीपेश्वर अभयारण्यात सफारी करण्याकरीता पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग www.magicalmelghat.in या संकेतस्थळावरून करता येईल. सुन्ना गेट व माथणी गेटवरून सफारी प्रारंभ करताना सहाय्यक वनसंरक्षक रविंद्र कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे, विवेक येवतकर आदी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पर्यटकांसाठी टीपेश्वर अभयारण्याचे दार उघडले: ऑनलाईन बुकींग करून अभयारण्यात करता येणार सफारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 27, 2021
Rating:
