"नामस्मरण"
मला माहूरला, माहूरला जाऊ द्या ना,
रेणुका देवीला डोळ्यानी पाहू द्या ना ll धृ ll
माहूरला जाऊ चला, देवीचे दर्शन घेऊ चला,
रेणुका देवीचे भजन गाऊ या ना,
रेणुका देवीला डोळ्यानी पाहू द्या ना....
मला माहूरला....पाहू द्या ना ll
मंगळवारी, शुक्रवारी भक्त येती दर्शनाला,
मला देवीच्या मंदिरी जाऊ द्या ना...
रेणुका देवीला डोळ्यानी पाहू द्या ना.....
मला माहूरला...पाहू द्या ना ll
ऊंच ऊंच डोंगरावर मंदिर आहे देवीचे,
तिच्या चरणावर नतमस्तक होऊ द्या ना....
रेणुका देवीला डोळ्यानी पाहू द्या ना....
मला माहूरला....पाहू द्या ना ll
मंदिरात शोभून दिसते,
मूर्ती सुंदर देवीची,
नर नारींनो दर्शन घेऊ या ना,
रेणुका देवीला डोळ्यानी पाहू द्या ना.....
मला माहूरला....पाहू द्या ना ll
नामस्मरण : मला माहूरला जाऊ द्या ना...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2021
Rating:
