धनंजय आसुटकर यांचा मार्डी येथे छोटेखानी सत्कार



सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२४ ऑक्टो.) : मागील २६ सप्टेंबर २०२१ ला धंनजय आसुटकर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमी, मुंबई तर्फे आदर्श राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार हा मिळाला.

हा पुरस्कार सामाजिक,राजकीय,काम करणाऱ्या व्यक्तींचा अकॅडमी च्या वतीने केला जातो. याच अनुषंगाने त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कामाची दखल घेत आदर्श राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला. प्रसिद्धीच्या कोसोदूर असलेला धंनजय आता लोकांच्या मनावर नकीच येतील. आज त्यांचा मार्डी येथे राज्यमानवधिकार आयोग मारेगाव तालुका उपाध्यक्ष प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते अतुल बोबडे यांच्या हस्ते छोटेखानी सत्कार करण्यात आला.
धनंजय आसुटकर यांचा मार्डी येथे छोटेखानी सत्कार धनंजय आसुटकर यांचा मार्डी येथे छोटेखानी सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.