टॉप बातम्या

मोहदा रस्त्यावरील खड्डा धोकादायक! पाईप लाईन फुटून पडला जीव घेणा खड्डा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (०३ सप्टें.) : मोहदा गावाजवळ असलेल्या पुलावर सिमेंट पाईप फुटून मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे, मत मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर यांनी आमच्या प्रतिनिधीला बोलून दाखविले आहे.

गावाच्या दिशेने वाहनांची वर्दळ असणाऱ्या पुलावर सिमेंट पाईप लाईन फुटून रस्त्यात अत्यंत जीव घेणा खड्डा पडला आहे. हा खड्डा बुजावण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधीला मॅसेज (sms) दिला व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून हा खड्डा बुजावण्यात यावा अशी माहिती देऊन सुद्धा अजूनपर्यंत खड्डा बुजवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे उपसरपंच रासेकर यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

रस्त्यात एवढा मोठा खड्डा पडला असून, वाहन चालकांसाठी हा खड्डा कधी ही धोकादायक ठरू शकतो. शिवाय या खड्ड्यांत वाहने आदळून वाहनांचे नुकसान होते; तसेच खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात येथे अपघात होण्याचीही शक्यता वाढली आहे. रस्त्यावरील मध्य भागातील खड्डा गेल्या दहा दिवसांपासून टक लावून पाहत आहे. मात्र, खड्डा दुरुस्त करण्याकडे प्रशासनाने पुरते दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करण्याऱ्या नागरिकांनी सदर खड्डा बुजावण्यात यावा अशी मागणी आहे.

मोहदा कृष्णापूर रस्त्यावर पडलेल्या खड्डयाचा मॅसेज मोहदा येथील उपसरपंच सचिन रासेकर यांनी वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार व सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली . परंतु दहा दिवस लोटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागा चे कामा कडे लक्ष नसल्याने हा खड्डा जशाच्या तसाच आहे.

श्री.रासेकर सांगतात की, सायंकाळी रस्त्यावर अंधार असतो. व रहदारी असते. रस्त्यावर अंधार असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे खड्ड्यात वाहने आदळतात. वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय वाहन चालकांनाही इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा खड्डा त्वरित बुजवून संभाव्य अपघात टाळण्यात यावा अशी मागणी उपसरपंच सचिन रासेकर यांनी केली आहे.
Previous Post Next Post