महाराष्ट्र विधान मंडळ रोहयो समिती कडून रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहाणी


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (०३ सप्टें.) : भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील महाराष्ट्र विधान मंडळ रोहयो समिती कडून रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. महाराष्ट्र् विधानमंडळ रोजगार हमी योजना समिती दिनांक २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दाखल झाली असून, त्या समिती चे सदस्य विक्रमसिंह बाळासाहेब सावंत आमदार सांगली विधान सभा क्षेत्र, दादाराव यादव केचे, आमदार आर्वी वर्धा विधांनसभा क्षेत्र, रामदास भगवत आंबटकर आमदार नागपूर विधानसभा क्षेत्र यांच्या कडून दिनांक २ सप्टेंबर रोजी सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यात आली. त्यात चंदनखेडा येथील विठ्ठल हनवते या शेतकऱ्याच्या शेतातील शेत तळ्याची पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे या समिती कडून चंदनखेडा बस स्थानक परिसरात पाम च्या झाडाचे करण्यात आले.

यावेळी मा. महेश शितोळे तहसीलदार भद्रवती, डॉ. मंगेश आरेवार गट विकास अधिकारी प.स.भद्रवती तसेच चंदनखेडा येथील सरपंच नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ भरती उरकांडे, ग्रामविकास अधिकारी किशोर नाईकवार माजी सरपंच सुमितजी मुडेवार ग्रा .प. सदस्य सौ प्रतिभा दोहतरे, निकेश भागवत, सौ. मुक्ता सोनूले, सौ रंजना हनवते, सौ. सविता गायकवाड नानाजी बगडे व आदी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान मंडळ रोहयो समिती कडून रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहाणी महाराष्ट्र विधान मंडळ रोहयो समिती कडून रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहाणी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 03, 2021 Rating: 5
Powered by Blogger.