सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापुर, (०३ सप्टें.) : तालुक्यातील पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहीका जीर्ण झाल्याने नविन रूग्णवाहीका मिळण्याबाबत पत्रकार राहुल वऱ्हाडे यांनी निवेदनातून शासनाकडे मागणी केली. याबाबत विविध माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. सोबतच रूग्णवाहीकेच्या मागणीचा पाठपुरावा पहापळ सर्कल च्या जिल्हा परिषद सदस्या सौ.सुचिरता अमर पाटील यांनी केला. त्यांच्या मागणीची दखल घेऊन पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत नविन रूग्णवाहीका दाखल झाली आहे.
आज ३ सप्टेंबर २०२१ रोजी पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीनi रूग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी आर्णी केळापुर विधानसभेचे आमदार डाॅ.संदिप धुर्वे, तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय मडावी, वैद्यकीय अधिकारी डाॅ.हर्षल पडोळे, पं.स.उपसभापती नंदुरकर, पं.स.सदस्या अनुराधा वेट्टी, विजय पाटील, पत्रकार राहुल वऱ्हाडे, रितेश परचाके, विनोद कोचे, रमेश भुरे, प्रशांत करपते, सुधिर कोचे, संतोष महल्ले, डाॅ.प्रकाश शिंदे, पिंटु कोचे, महेश चौधरी, संभु कुडमथे, प्रमोद पंचभाई, नंदु ताजणे, पप्पु कायरकर, अवि कुडमथे, पवन काळेवार, कैलास वेट्टी, भाऊराव ठाकरे, दिपक सानप, गजानन खांडरे, पवन डोळसकर, सुमित ताजणे, दिनेशभाऊ आदी उपस्थित होते.
पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रूग्णवाहीकेचे लोकार्पण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 03, 2021
Rating:
