शिवसेनेच्या उप तालुका प्रमुख पदावर सुभाष राठोड व राहुल ताडपेल्लीवार यांची निवड


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०३ सप्टें.) : मा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचे मार्गदर्शनाखाली  सुभाष राठोड व राहुल ताडपेल्लीवार यांची शिवसेनेचे उप तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या पुढे पक्ष संघटना वाढी साठी दोन्ही उपतालुका प्रमुख प्रयत्न करून येणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार कसे निवडून आणता येईल याबद्दल प्रयत्न करण्यार आहे.

या नियुक्तीचे श्रेय हरीहर लिंगनवार माजी उपजिल्हा प्रमुख, गजानन बेजंकिवार, सभापती कृउबास,जयवंत बंडेवार तालुका प्रमुख, मा.तालुका प्रमुख तिरुपती कंदकुरीवार, यांना दिले.
Previous Post Next Post