सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
पांढरकवडा, (०३ सप्टें.) : NH-४४ वरून पाटणबोरी ते मुकुटबन रस्त्याची दयनीय अवस्था व होणाऱ्या कामामधला भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम पाहून या कामाच्या तक्रारी फोटो पुराव्या सहित देण्यात आले. परंतु कुठलीही एक्शन घेण्यात आलेली नाही. रास्ता रोको करण्यात आला, तरी सुद्धा संबंधित बांधकाम विभागाने कुठलेही पाऊल उचलले नाहीत. संतप्त होऊन या परिसरातील टाकळी, दाभा, सत्पल्ली, कमळवेल्ली ,पाटण, दुर्भा, मुकुटबन व या परिसरातील सरपंच व गावकरी जनता दिनांक ३०/८/२०२१ बांधकाम विभागाला दिलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्याने निराश झालेल्या निवेदन कर्त्यांनी आज दिनांक ३/०९/२०२१ ला तहसील कार्यालयासमोर माजी आमदार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी काही मागण्या पुढील प्रमाणे : (१) मुकुटबन ते पाटणबोरी हा रोड इस्टिमेट व डिझाईन नुसार व्हावा. (२) बांधकाम विभागाचे या रोड संबंधित अधिकारी यांना निलंबित करा. (३) १७/८/२०२१ ला सार्वजनिक बांधकाम विभागाला मागितलेली माहिती द्या. या मागण्या घेऊन लोकनेते माजी आमदार वामनराव कासावार, कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबन सभापती संदीप भाऊभाऊ बुर्रेवार, केशव लक्षटटीवार, प्रकाश कासावार राहुल दांडेकर, अमर भाऊ पाटील, जे. एच. सोखी, प्रकाश म्याकलवार, प्रदीप भाऊ बेलखडे, विठ्ठल चेतन गीजेवार, चंद्रशेखर बोंगीरवार, राकेश गालेवार, गंगाधर आत्राम, चंद्रशेखर बेलखडे, शंकर आकुलवार, पांडुरंग भुसेवार व परिसरातील सर्व जनता या आंदोलनामध्ये सहभागी झाले.
पांढरकवडा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 03, 2021
Rating:
