टॉप बातम्या

तरुण आणि तरुणीने घेतली पुलावरून पैनगंगेच्या पात्रात उडी


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (०२ सप्टें.) : तरुण आणि तरुणी ने धनोडा येथे पुलावरून पैनगंगेच्या पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पुलावरील लोखंडी कठड्याला तरुणीची पर्स व बॅग अडकून ठेवलेली आढळून आली. या बॅगमध्ये तरूणाचे आधार कार्ड असून तरुणीचा व तरुणाचा फोटो आहे. हेमंत राजेंद्र चिंचोलकर असे तरुणाचे नाव आहे. तरुणीचे नाव मात्र, कळू शकले नाही.

सदर तरुण आणि तरुणी सायंकाळी सहा वाजता धनोडा येथे बस मधून उतरले. त्यांच्या बॅगमध्ये नागपूर आणि रामटेक बसची तिकीटे आहेत. या दोघांनी धनोडा येथे बिस्कीट आणि फराळाचे साहित्य विकत घेतले व साधारणत: दोन तासापर्यंत ते बसस्थानक परिसरात होते. त्यानंतर या दोघांची बॅग व पर्स पुलास लटकवलेली आढळली. या दोघांनी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Previous Post Next Post