सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (११ सप्टें.) : गणेश उत्सव आणि आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महागाव पोलिसांनी फुलसावंगीत रुटमार्च काढला. तसेच दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
कायदा व सुव्यवस्थेला नख लावणाऱ्यांची गय केल्या जाणार नसल्याचे प्रतिपादन यावेळी महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी केले.
बसस्थानक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मस्जिद चौक, ग्रामपंचायत कार्यालयात आणि गणपती मिरवणूक मार्गाने संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून फिक्स पॉइंट लावण्यात आले होते.
या रंगीत तालीम आणि रुट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, उपनिरीक्षक राहुल वानखेडे, गुप्त विभागाचे अर्जुन राठोड सह २५ पोलीस कर्मचारी, १० रेल्वे पोलीस कर्मचारी, २५ गृहरक्षक, २५ पोलीस मित्रांच्या साहाय्याने हा रुट मार्च यशस्वी करण्यात आला.
फुलसावंगीत पोलीस प्रशासनाच्या वतीने "रुट मार्च"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2021
Rating:
