सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२८ सप्टें.) : गावातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला धारेवर धरणरे तसेच नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता स्वता पुढाकार घेऊन वेळ पडल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणारे लोकनेते प्रदिप बांदुरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. भरताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशासह तालुक्यात सेवा सप्ताह राबविण्यात आला. या सेवा सप्ताहाच्या समारोपीय समारंभात वणी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रदिप बांदुरकर यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. माजी खासदार हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थतीत स्थानिक कल्याण मंडपम येथे सेवा सप्ताहाचा समरोपीय समारंभ पार पडला. प्रदिप बांदुरकर यांच्या भाजप प्रवेशाने राजकारणात मोठा बदल घडून येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राजूर इजारा येथिल रहिवासी असलेले प्रदिप बांदुरकर हे आधी बराच काळ मनसेचे राजूर विभाग प्रमुख राहिले. त्यांनी काही दिवसांआधी मनसेला रामराम ठोकत आता भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. सेवा सप्ताहाच्या कल्याण मंडपम येथे झालेल्या समरोपीय समारंभात माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, रवी रेभे उपस्थीत होते. या सर्वांच्या समक्ष प्रदिप बांदुरकरसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केला.गावातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाला धारेवर धरणरे तसेच नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याकरिता स्वता पुढाकार घेऊन वेळ पडल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणारे लोकनेते प्रदिप बांदुरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. भरताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशासह तालुक्यात सेवा सप्ताह राबविण्यात आला. या सेवा सप्ताहाच्या समारोपीय समारंभात वणी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी प्रदिप बांदुरकर यांना भाजपा मध्ये प्रवेश देऊन त्यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. माजी खासदार हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थतीत स्थानिक कल्याण मंडपम येथे सेवा सप्ताहाचा समरोपीय समारंभ पार पडला. प्रदिप बांदुरकर यांच्या भाजप प्रवेशाने राजुरच्या राजकारणात मोठा बदल घडून येणार असल्याची चिन्हे दिसत आहे. राजूर इजारा येथिल रहिवासी असलेले प्रदिप बांदुरकर हे आधी बराच काळ मनसेचे राजूर विभाग प्रमुख राहिले आहे. त्यांनी काही दिवसांआधी मनसेला रामराम ठोकत आता भाजपा मध्ये प्रवेश घेतला आहे. सेवा सप्ताहाच्या कल्याण मंडपम येथे झालेल्या समरोपीय समारंभात माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, रवी रेभे उपस्थीत होते. या सर्वांच्या समक्ष प्रदिप बांदुरकरसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहिर प्रवेश केला.
मनसेतून बाहेर पडलेल्या प्रदिप बांदुरकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
