आदिवासी बांधवांचे तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (१४ सप्टें.) : शहरातील आदिवासी नागरिकांना शबरी घरकुल चा लाभ मिळावा तसेच अतिक्रमणधारकांना नमुना ८ देण्यात यावा व इतर मागण्यासाठी इतर समाज व आदिवासी समाज नागरिकांनी महागांव तहसील समोर साखळी उपोषण  दिनांक १३ पासून सुरुवात केली आहे.

मागील २० वर्षापासून आदिवासी समाजाला सदरील घरकुलाचा लाभ मिळाला नाही व तसेच वीस ते तीस वर्षापासून राहत असलेल्या अतिक्रमण धारकांना नमुना ८ मिळाला नाही. परिणामी अनेक नागरिक स्मशानभूमी जवळ व इतरत्र शासकीय जागेवर अतिक्रमण धारण करून राहत आहेत. त्यांना नमुना ८ देणे आवश्यक असतांना नगरपंचायतच्या निष्क्रियपणामुळे त्यांना नमुना ८ दिला नाही तसेच नगरपंचायतकडे प्रलंबित रमाईचे प्रस्ताव धूळ खात दोन वर्षापासून पडून आहेत.  मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावे स्थानिक नागरिक कार्यकर्ते मागणी करत आहे.

हे उपोषण आजपासून असून, मागील २५ ऑगस्ट रोजी देऊनही निवेदनाची दखल मुख्याधिकारी यांनी घेतली  नसल्याचे उपोषण करण्याचे म्हणणे आहे. या उपोषणाचे नेतृत्व प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे, गजानन मोरे, विपुल नेवारे, संतोष इंगळे, गजानन इंगळे, युवराज इंगळे, सुनील मनवर, प्रभू मोरे परमेश्वर बेले, गणेश ढगे, अमोल मुकाडे, माधव मोहोकर, वर्षा भगत, प्रतिभा पानसे, संगीता धोटे व अन्य शेकडो नागरिक उपस्थित होते.
आदिवासी बांधवांचे तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण आदिवासी बांधवांचे तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण Reviewed by सह्याद्री चौफेर on September 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.