Top News

बेलोरी येथे चोरट्याचा धुमाकूळ, बोरवेल चा केबल चोरट्यांनी लंपास केला

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१४ सप्टें.) : पांढरकवडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बेलोरी शेत शिवारातील बोरवेलचा केबल रात्री चोरट्यांनी लंपास केला. सुनील पावडे यांचे बेलोरी शिवारात शेत असून तेथे बोअरवेल असुन बोअरवेलला असलेला २०० फूट तांब्याच्या धातूने केबल पोळ्याच्या मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेला.

याबाबत सदर शेतकरी सुनील पावडे यांनी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे रीतसर तक्रार दाखल केली असता पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पाहणी करून गेले परंतु तब्बल सहा दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा पोलिसांना चोरट्याचा शोध लागू शकला नाही तरी पोलिसांनी चोरट्यांना त्वरित शोध घेऊन लंपास केलेला केबल मिळवून द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post