सह्याद्री न्यूज | संतोष गडवे
औरंगाबाद, (२२ सप्टें.) : महाराष्ट्र राज्य शासनाची आरोग्य विभागाची परीक्षा दि.२५,२६ संप्टेबर २०२१ या तारखेला होणार असून, तरी आज तारखे पर्यंत अजूनही विद्यार्थ्यांच्या हातात या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा देणार कशी?
नरवाडे सांगतात की, जर विद्यार्थी बाहेरील जिल्ह्याचे फॉर्म भरलेले असतील तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागेल, उदरणार्थ औंगाबादचा विद्यार्थी हा यवतमाळ उस्मानाबाद, अमरावती, नागपुर आदी जिल्ह्यात जाण्यासाठी दोन दिवस लागतात. सध्या मुसळधार पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या हातात नाहीत, मग विद्यार्थी कोणत्या सेंटरवर व कसा पोहचेल आणि सध्या आरोग्य केंद्राचे इंटरनेट सर्व्हेवर (साईट) बंद आहे. ऐनवेळी जर हॉल तिकीट आले तर, बाहेरील जिल्यातील विद्यार्थ्यांना वाहतूकदार सदर पत्रिका केंद्रावर पोहचविण्यासाठी जास्तीची लूट करतील,त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना अश्या परिस्थतीमध्ये काय करायचे हा प्रश्न विद्यार्थ्या समोर आहे.
अशात जर विद्यार्थी सेंटरवर पोहचला नाही तर, विद्यार्थ्यांनी जी फीस रू.४५०/_ भरणा केलेली आहे, ती वाया जाईल व विद्यार्थ्याचे नुकसान होईल. परत आम्ही नोकरी पासून वंचित राहू,गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होईल व त्यातच काहीचे वय देखील संपत आहेत. तसेच, परिक्षा या पारदर्शकपणे घेण्यात याव्यात, जे परीक्षासाठी डमी उमेदवार बसविल्या गेल्यास व तसे आढळुन आल्यास त्यांच्या वर व त्यांना सहकार्य करणारे आधिकरी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
वरील बाबीचा विचार करून सदरील परिक्षा पुढे ढकलुन ग्रुप सी. ग्रुप डी. ची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परिक्षेत किमान आठ दिवसाचा तरी अंतर असावे, जेणेकरून विद्यार्थ्याना परिक्षा सेंटरवर पोहोचणे शक्य होईल व विद्यार्थ्याना संधी मिळेल.
आधीच महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे आणि परिक्षेच्या कारभारात वरीलप्रमाणे गोंधळ असेल तर तरूण पिढी ही सरकारी नौकरीपासुन वंचितच राहील व पुन्हा महाराष्ट्र बेरोजगाराच्या खाईत ढकलला जाईल, करीता वरील प्रकरणाची दखल घेऊन परिक्षा आठ दिवस पुढे ढकलुन विद्यार्थ्याना न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) विद्यार्थी आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मनीष नरवडे, योगेश उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्रा. राजकुमार गाजरे नितिन मोहीते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शासनाची आरोग्य विभागाची परिक्षा आठ दिवस पुढे ढकलावी - मनीष नरवडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2021
Rating:
