सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२० सप्टें.) : आज साेमवार ला दुपारी एक नंतर चंद्रपूरात मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ बरीच कमी झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.
काल ही सायंकाळी शहरात असाच एक तास पाऊस पडला. सध्या पावसाचा जाेर कमी झाला असला तरी,, विजेच्या कडाकडाटसह या पावसाची रिमझिम (हे वृत्त लिहीपर्यंत) सुरुच हाेती.
हवेत गारठा निर्माण झाला आहे. तर शेतक-यांच्या शेतातील उभ्या पीकाला या पावसामुळे नुकसान हाेण्यांची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूरात आज मुसळधार पाऊस, हवेत गारठा !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2021
Rating:
