प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरीत भरणा करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२० सप्टें.) : वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांच्या च्यावतीने निवेदन तहसिलदार मार्फत आरोग्य मंत्री यांनी महागांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील रिक्त पदे ताबडतोब भरण्यात यावे. कारण आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे जनतेला नाईलाजास्तव खाजगी दवाखान्यामध्ये जावे लागत आहे. परिणामी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने रिक्त पदे भरावी अशी मागणी करण्यात आली.
 
लॉकडाउनमुळे गेल्या दोन वर्षांपासून गोरगरीबांच्या  हाताला काम नाही. कामाची वणवण आहे आणि अशातच सर्दी, ताप, खोकला डेंग्यू मलेरियाची साथ चालू आहे. परंतु आपले आरोग्य विभाग सलाईनवर असल्यामुळे आरोग्य मंत्री यांनी आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रा मधील रिक्त पदे त्वरित भरावी. अन्यथा वंचित बहुजन आघाडीला तिव्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल असा, इशारा ही यावेळी वंचित च्या कार्यकर्त्यांनी दिला.
 
यावेळी तालुकाध्यक्ष शेख अश्फाक शेख आगा, माजी जिल्हाध्यक्ष विजय लहाने, शहराध्यक्ष पप्पू कावळे, सतीश खाडे, विजयकुमार कांबळे, रामराव कांबळे, अमोल भगत, प्रतीक गायकवाड, शे अजीम शेख मुस्तफा, राहुल तायवाडे, वंदना भवरे, बुद्धरत्न भालेराव, अनिल मनवर, मंगेश केदार, प्रकाश खिल्लारे शुदरशन टुमके वंचित चे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरीत भरणा करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरीत भरणा करा - वंचित बहुजन आघाडीची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.