कोरोना काळात आशा सेविकांचे योगदान मोलाचे: आमदार सुभाष धोटे


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२० सप्टें.) : तालुक्यातील गडचांदूर औद्योगिक नगरी गडचांदूर येथील प्रसिद्ध गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने सामाजिक आदर्श जपत आशा सेविकांना साडी व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. यावेळी २३ आशा सेविकांची उपस्थिती होती.

गेल्या १४ वर्षापासून गडचांदुरचा राजा गणेश मंडळ समाजपयोगी उपक्रमातून समाजात आदर्श निर्माण करत आहे. आशा सेविकांचा सत्कार करताना आमदार सुभाष धोटे यांची विशेष उपस्थिती होती. कोरोना काळात आशा सेविकांना केलेले कार्य अतुलनीय आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. कृतज्ञतेच्या भावनेने साडी व सन्मानचिन्ह देऊन केलेला गौरव त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

यावेळी गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम, नगरसेवक अरविंद मेश्राम, नगरसेवक विक्रम येरणे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, नगरसेविका अर्चना वांढरे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक राहुल उमरे यांची विशेष उपस्थिती होती. महिलांचे आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान आहे. आशा सेविका तळागाळात पोहचवून सेवाभावी काम करतात. गडचांदुरचा राजा गणेश मंडळाने घेतलेल्या पुढाकाराने आशा सेविकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मंडळाचे सुयोग कोंगरे, अक्षय मेंढी, गणेश कवलकर, सचिन सातभाई, भाविक कुळमेथे, नितेश डाकोरे, दत्ता बोढाले, महेश परचाके, वैभव पारखी, निखिल पिंपळशेंडे, अमित कोरे, सचिन जगनाडे आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कोरोना काळात आशा सेविकांचे योगदान मोलाचे: आमदार सुभाष धोटे कोरोना काळात आशा सेविकांचे योगदान मोलाचे: आमदार सुभाष धोटे Reviewed by सह्याद्री चौफेर on September 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.