सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
पांढरकवडा, (२३ सप्टें.) : वारा-कवठा लगत असलेले वांजरी शिवारात आज सकाळी वाघांचे दर्शन झाले. वाघाने जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरला.
केळापूर तालुक्यात अनेक गावात वाघाची दहशत वाढली आहे. त्या कारणाने शेतकरी व शेतमजुर आपली खबरदारी घेतली पाहिजे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरत आहे. शेतकऱ्यांना शेतात कामावर जायला भीती वाटत असून, शेतात मजूर मिळणे कठीण झाले आहे. जनावरांच्या शिकारीच प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वनरक्षकांकडून करण्यात येत आहे.
मुक्त संचारमुळे अनेक घटना घडत आहे. प्रशासनाने तातडीने योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी आता वांजरी ग्रामस्थ करत आहे.
वांजरी शिवारात वाघांची दहशत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2021
Rating:
