चंद्रपूर : मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाकेंवर विभागीय चाैकशा प्रस्तावित - एसीबीच्या जाळ्यात अडकले हाेतेयं हे दाेन्ही मंडळ अधिकारी
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० संप्टें.) : महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाके यांचे वर नुकत्याच विभागीय चाैकशा प्रस्तावित झाल्या असल्याचे खात्रीलायक व्रूत्त प्राप्त झाले आहे. तसे अहवाल चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे पत्रांच्या अनुषंगाने तहसीलदार भद्रावती व तहसीलदार मूल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना या दाेन्ही लाचखाेर मंडळ अधिका-यांनी त्यांचे शेतीविषयक फेरफार प्रमाणित करण्यांसाठी त्यांना लाचेची मागणी केली हाेती. त्यानंतर त्यांचे तक्रारींच्या अनुषंगाने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी व पथकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील या दाेन्ही लाचखाेर मंडळ अधिका-यांना कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता सापळा रचुन लाच घेतांना रंगेहात पकडले हाेते. जिल्ह्यातील बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांस भद्रावती तहसील कार्यालयात दीड हजार रुपयांची लाच घेतांना तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील मंडळ अधिकारी महादेव कन्नाके यांस तहसील कार्यालय परिसरातील बाहेरच्या एका पानटपरीवर भेजगांवचे विद्यमान सरपंच तथा काँग्रेसचे युवा नेता अखिलेश गांगरेड्डीवार यांचे कडुन (एका शेतजमीन फेरफार प्रकरणात) तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले हाेते. विशेष म्हणजे हे दाेन्ही मंडळ अधिकारी याच वर्षात एसीबीच्या जाळ्यात लटकले हाेते. यांनी कास्तकारांना अक्षरशा वेठीस धरले हाेते.(शासकीय महसुल सेवेत असतांना) शासनाकडुन गलेलठ्ठ साठ ते सत्तर दरमाह वेतन घेत असतांना देखिल या दाेन महाभागांनी कास्तकांराना लाचेची मागणी करणे सुरु ठेवले हाेते. आता चंद्रपूर विभागीय चाैकशा प्रकरणात या लाचखाेर मंडळ अधिका-यांना बयान नाेंदविण्यासाठी तसेच प्रत्येक आराेपांचे लेखी उत्तर देण्यांसाठी प्रत्यक्षात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणातील महादेव कन्नाके हे अद्यापही निलंबित आहे तर प्रशांत बैस यांना कामावर घेण्यांत आले असल्याचे समजते.
चंद्रपूर : मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाकेंवर विभागीय चाैकशा प्रस्तावित - एसीबीच्या जाळ्यात अडकले हाेतेयं हे दाेन्ही मंडळ अधिकारी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
