सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (३० संप्टें.) : दि.२९ सप्टेंबर बुधवारला वरोडी सेवा सहकारी सोसायटी यांच्या तर्फे सुवर्णपदक पटकावणाऱ्या सेवानगर येथील राजकुमार भिकु जाधव व अमन आडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वरोडी सोसायटी अध्यक्ष नंदकुमार मस्के उपाध्यक्ष दत्ता माने, संचालक सुखदेव राठोड, किशोर नगारे, रामहरी पाटील आडकीने, मुन्ना राठोड, नामदेव काळे, सुनील शिरगिरे, रंगराव ठाकरे, परशराम राठोड, पांडुरंग पवार, निरंजन कवाने यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. हरियाणा येथे आयोजित स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने हरियाणा येथे आयोजित 22 वर्षीय वयोगटांमध्ये सुवर्ण पदक तर 17 वर्षीय गटामध्ये सिल्वर मेडल (कब्बड्डी) मिळवणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये महागाव तालुक्यातील सेवानगर कासारबेळ येथील राजकुमार जाधव व अमन आडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व राजकुमार आणि अमनला पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्य प्रसंगी या सभेला उपस्थित असलेले कृषी विभागातील नंदकिशोर आडे यांनी नानाजी देशमुख कृषी विभागातील या भागात उत्तम काम केल्यामुळे त्यांचाही सत्कार या वेळी सोसायटी तर्फे करण्यात आला आहे.
या दरम्यान, पोकरा शेड नेट योजनेचे घेतलेले प्रगतशील शेतकरी रामहरी पाटील आडकीने यांनी लाभ घेतला तसा लाभ इतरही शेतकऱ्यांनी घ्यावे असे आव्हान आडे यांनी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नगारे केले तर सचिव सुधाकर चिकने यांनी आभार मानले.
वरोडी सोसायटी तर्फे राजकुमार व अमन यांचा सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
