सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (२८ सप्टें.) : पंचायत समिती झरी (जा) अंतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा, माथार्जुन येथील आदिवासी विध्यार्थी शिष्यवृत्ती रक्कम सन- २०१९-२० रोखीने वाटप करण्याची मागणी मा.शिक्षण सभापती व मा.शिक्षणधिकारी (प्राथ), जि.प.यवतमाळ यांचे कडे आदिवासी विध्याथ्याचे पालक आणि आदिवासी समाजातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार शाळेचे मुख्याध्यापक श्री.अनिल जावळकर आणि श्री.मिथुन राजूरकर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती माथार्जुन यांनी केली आहे.
माथार्जुन हे पेसा अंतर्गत येणारे दुर्गम क्षेत्रातील गाव असून येथील विद्यार्थ्याचे पाटणबोरी व झरी येथील बँकेत खाते आहे. सदर ठिकाणी ये-जा करण्यास महामंडळाची बस उपलब्ध नाही. काही विद्यार्थ्याचे बँक खाते व्यवहार न झाल्याने बंद पडले आहे. कोविड परिस्थितीत विद्यार्थी व पालकांना बँकेत जाणे धोक्याचे असून पालकांचा किमान दोन ते तीन दिवस रोजगार बुडणार आहे. यापूर्वी दोन वर्षा अगोदर कोविडचे संकट नसतांना शिष्यवृत्ती रक्कम रोखीने वाटप करण्यात आली होती.
आदर्श शाळा निर्माणामधील कार्यात समाज सहभाग निधी वर्ग १ ते ४ प्रति विध्यार्थी १००/- रु. आणि वर्ग ५ ते ७ प्रती विध्यार्थी १५०/- रुपये देण्याचे पालकांनी कबूल केले आहे. तरी पेसा अंतर्गत येणाऱ्या दुर्गम क्षेत्रातील आदिवासी पालकांच्या आणि लोकप्रतिनिधी च्या मागणीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आदिवासी विध्यार्थी शिष्यवृत्ती रोखीने वाटप करण्याची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
