सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२८ सप्टें.) : दि. २७ सप्टेंबर ला झुंझारपूर येथील आदिवासी महिला व बालकांना इंडीया फुड बैंकिंग नेटवर्क व अन्नक्षेत्र फाउंडेशनच्या वतीने नॅशनल हायवे 44. येथील लागून असलेल झुंझारपुर गावात राशन किट्स तसेच मुलांना शक्तीवर्धक Cadburies 5 star bournvita,Oreo Biscuits,Chocobix, Hershey’s calcium protin shakes, Natural Juices चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक जॉनसन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी केळापूर सुरेश कव्हळे तहसीलदार, प्रमुख उपस्थिती अरुणाताई पुरोहित सामाजिक कार्यकर्त्या नागपूर, सामाजिक कार्यकर्ते दयानंद सोयाम, सुनील चिंतावार ग्रामसेवक गट ग्रामपंचायत झूंझारपुर, अरुण कुलकर्णी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दत्ताजी फडणिस सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्राहक प्रहार संघटनेचे अभय निकोडे, यशवंत काळे, मार्गदर्शक दामोधर बाजोरीया कार्यक्रमाचे आयोजन व जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नागोराव भनारकर व अरुण करलुके, राहुल गेडाम, आकाश वहिले, अजय शिवरकर, विनय उस्केवार, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अरुणा पुरोहित यांनी केले व आभार प्रदर्शन प्रदिप भनारकर यांनी मानले.
इंडीया फुड बैंकिंग नेटवर्क व अन्नक्षेत्र फाउंडेशनच्या वतीने झुंझारपुर गावात राशन किट्स वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
