सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८सप्टें.) : चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील शंकरपूरच्या राजू वैद्य यांनी बाेगस रासायनिक खताची विक्री केल्यामुळे याचेवर कायदेशीर कारवाई करण्यांची मागणी आज मंगळवार दि.२८ सप्टेंबरला प्रहारच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली आहे.
वैद्य यांनी दत्त कृषि केन्द्र या नावाने शंकरपूर नगरीत आपले दुकान थाटले असुन, अनेक शेतक-यांनी त्यांचे कृषि केन्द्रातुन डिएपी ही रासायनिक खते विकत घेतली आहे. परंतु पिकांवर कुठलाच परिणाम दिसुन न आल्यामुळे कमलाकर ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा कृषि अधिकारी यांचे कडे रितसर तक्रार नाेंदविली. संबंधित खताचे नमूने तपासणीसाठी पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालय नागपुर व शेतकरी माती परिक्षण शंकरपुर यांचे कडे पाठविले असता अहवालात स्पष्ट पणे नमुद केले आहे की, यात रासानिक घटकांचा समावेश शुन्य आहे. या बाबीकडे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी तातडीने लक्ष पुरवून संबंधित दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करावी.
कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षा कडुन लवकरच आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा सादर केलेल्या निवेदनातुन महेश हजारे, शेरखान पठाण,अफराेज अली व अशिद मेश्राम, यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना आज प्रत्यक्षात शेतकरी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात माेठ्या संख्येने हजर हाेते.
बाेगस रासायनिक खते विक्री करणाऱ्या शंकरपूरच्या राजू वैद्यवर कारवाई करा - प्रहारची मागणी !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 28, 2021
Rating:
