पाेलिस चाैक्या सुरु करण्यांस पोलिस मिञ व आम आदमी पार्टीने केले सफाई अभियान

सह्याद्री न्यूज : किरण घाटे 
चंद्रपूर, (०५ सप्टें.) : शहरातील बाबुपेठ व लालपेठ मध्ये गुन्हेगारी सातत्याने वाढत असून, या भागातील जागृत नागरीकांनी व महिलांनी आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांच्या कडे या संदर्भात तक्रारी केल्या आहे.

याच तक्रारीच्या अनुषंगाने आज रविवारला संबंधित विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करुन या भागातील बंद असलेल्या पाेलिस चाैक्या सुरु करण्यांची मागणी करण्यांत आली .गेल्या कित्येक दिवसांपासून बाबुपेठ व लालपेठ या प्रभागातील पोलीस चौक्या बंद व पडक्या अवस्थेत असल्याने तेथील परिसरात कचरा साचलेला आहे .
दरम्या, या मागणीची दखल घेऊन चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आंबोरे यांच्या सोबत बाबूपेठ आपच्या एका शिष्टमंडळाने चर्चा केली. चर्चेला तात्काळ प्रतिसाद देत सहकार्य करण्यांचे त्यांनी या वेळी आश्वासन दिले.
रविवार दि. ५ सप्टेंबरला आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहर पोलीस स्टेशन चे एक पथक यांच्या सहकार्यातुन पोलीस चौकी परिसरात स्वच्छ्ता अभियान राबविण्यांत आले .या सफाई अभियानात आपचे जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, शहर सचिव राजु शंकरराव कुडे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवर, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, प्रभाग संयोजक सुखदेव दारुंडे, संस्थापक सदस्य अश्रफ सय्यद, चंदु मदुरवार, प्रवीण चूनारकर, शंकर कायारकर, महेश सिंह पाजी, महेश गुप्ता, बाबाराव खडसे, सुशांत धकाते, जयदेव देवगडे, बाबुपेठ प्रभागाच्या महिला संयोजिका श्रीमती सुजाता बोदेले या शिवाय पोलीस निरीक्षक आंभाेरे व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.
पाेलिस चाैक्या सुरु करण्यांस पोलिस मिञ व आम आदमी पार्टीने केले सफाई अभियान पाेलिस चाैक्या सुरु करण्यांस पोलिस मिञ व आम आदमी पार्टीने केले सफाई अभियान Reviewed by सह्याद्री चौफेर on September 05, 2021 Rating: 5
Powered by Blogger.