महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पाटणबोरीची नविन कार्यकारणी गठीत


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
पाटणबोरी, (२०सप्टे.) : दिनांक १९ सप्टेंबर रोजी स्थानिक श्री कालीका मंदिरात पत्रकार कार्यकारिणी गठीत करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. पण, ठरल्याप्रमाणे नव्यांना संधी न देता जुन्याच व्यक्तींना अध्यक्ष बनविले. परंतु अनेक लोकांना ही बाब पटली नाही, त्यामुळे जवळपास तेरा पत्रकारांनी एकत्रित येऊन आपली नवीन कार्यकारिणी अविरोध तयार करण्यात आली.

यावेळी जयंत भागानगरकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष सचिन पत्रकार, उपाध्यक्ष आदित्य भागानगरकर, कार्याध्यक्ष विनोद कनाके, सचिव सचिन गुडेटवार, सहसचिव भास्कर मालीकर, कोषाध्यक्ष मोहन एनगुर्तीवार तर, सदस्य म्हणून सौ.संध्याताई भागानगरकर, अमन सिडाम, कार्तिक धुर्वे, सल्लागार म्हणून गोपालजी शर्मा, नंदुभाऊ अर्गुलवार, मोबीन जाटू, अनिल गुंडेवार व जयंत भागानगरकर आदींची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी वरील प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली असे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पाटणबोरीची नविन कार्यकारणी गठीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पाटणबोरीची नविन कार्यकारणी गठीत Reviewed by सह्याद्री चौफेर on September 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.