सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (१० सप्टें.) : युवा लेखक संजय राखडे यांचे लिखाण हे समाजाला दिशा देणारे युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करून नवा समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे, प्रतिपादन माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांनी केले.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राखडे यांनी आपल्या अनुभवातुन व सत्य परिस्थिती असलेले एका मुलीचे आयुष्य बरबाद होतांना पाहिले ही लेख माला ५० भागांमध्ये सोशल मीडियावर प्रकाशित केली असुन या लेखमालेवर लवकरच पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याने आधारस्तंभ श्री. साहेबराव पाटील मित्र परिवाराच्या वतीने संजय राखडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानावावरून बोलतांना पाटील पुढे म्हणाले की, मागासलेल्या भोई समाजातील अल्प शिक्षण असलेल्या संजय राखडे यांनी केलेले लिखाण हे अतिशय मोलाचे असुन समाजाने जुन्या रूढी परंपरा या मागे न लागता काळानुरूप वागण्याची शिकवण देणारे आहे त्यामुळे समाजाने त्यांच्या या लिखाणाचा फायदा समाजाच्या उत्थानासाठी करून समाजाचा विकास साधुन समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे त्यामुळे सर्व युवकांनी त्यांच्या लिखाणापासुन प्रेरणा घेण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन हिवरा पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान फाळके, माजी सरपंच डॉ.धोंडिराव बोरूळकर, माजी सरपंच प्रविण जामकर, महागावचे पशु चिकित्सक डॉ.डी. बावणे, शुभम हरसुळे, अविनाश दरोडे, मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, पत्रकार राजेंद्र गिरी, विनोद खोंडे, राजेंद्र कदम, अनिल जाधव, बालाजी मुधोळ, गणेश कदम, यांची उपस्थिती होती.
यावेळी याकार्यक्रमाला समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधारस्तंभ श्री साहेबराव पाटील मित्र परिवाराचे संजय सोनुने, गजेंद्र जामकर,अमोल ठाकरे, मुकुंद जामकर, किरण काळे, शेख सलीम शेख सत्तार, अविनाश ठाकरे, सचिन बेलखेडे, विकास कदम, नितीन कदम, अमोल पाटील कदम यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक पत्रकार महेश कामारकर यांनी केले तर आभार माजी सरपंच डॉ.धोंडिराव बोरूळकर यांनी मानले.
राखडे यांचे लिखाण समाजाला दिशा देणारे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2021
Rating:
