मारेगाव येथे लोकन्यायालयात २०५ प्रकरणाचा निकाली


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० सप्टें.) : येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात विविध स्वरूपाच्या प्रलंबित २०५ केसेस चा निपटारा करण्यात आला. यात ३९ लाख रुपायाच्यावर तडजोड राशी जमा झाली.

राष्ट्रीय लोक अदालात अंतर्गत येथील न्यायालयात अनेक लंबीत दिवाणी व फौजदारी केसेस चा आपसी तडजोडी ने निपटारा करण्यात आला. यात वादपूर्व २०५ प्रकरणे आणि दाखल आपसी तडजोड चे ४० प्रकरणे असे एकूण २०५ केसेस चा "लोक अदालत" मध्ये निपटारा करून ३९ लाख ७८ हजार ९९८ रुपये आपसी तडजोड राशी जमा झाली. यात पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश निलेश वासाडे तर सदस्य म्हणून एड. मेहमूद पठाण, सुमित हेपट यांनी कामकाज बघितले.

लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी डोईजड, बी.पी. चव्हाण, आर.वैद्य, पी.वासाड, एस. टेबरें, शेबे, बुजाडे, राऊत यांनी परिश्रम घेतले.
मारेगाव येथे लोकन्यायालयात २०५ प्रकरणाचा निकाली मारेगाव येथे लोकन्यायालयात २०५ प्रकरणाचा निकाली Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.