सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
यवतमाळ, (३० सप्टें.) : कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन प्लांट निगा व दुरुस्ती एन एस क्यू एफ लेव्हल चार चे प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे नुकतेच संपन्न झाले. भारत सरकार तर्फे एन एस डी या योजने च्या माध्यमातून वीस उमेदवाराची निवड करून त्यांना शिल्पनिदेशक जे. एस. वानखेडे व डी. आर. दारुंडे यांनी यशस्वी प्रशिक्षण दिले.
सदर प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम २८ ला डॉ. मिलिंद कांबळे (वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेच. आपण सर्वांनी बघितलेच आहे की, या कालावधीत ऑक्सिजन हा केवळ प्राणवायूच नसून प्राथमिक दृष्टया आजाराचे औषध ठरल्याचे आपल्या निदर्शनास येते. त्यामुळे ऑक्सीजन म्हणजे कोरोनावरचे औषधच आहे. असे मत वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद कांबळे यांनी प्रसंगी व्यक्त करतांना भविष्यामध्ये ऑक्सीजन प्लांट साठी आवश्यक असणारी निगा व दुरुस्ती करणारे प्रशिक्षणार्थी तयार करण्याच्या दृष्टीने सदर प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळचे प्राचार्य प्रमोद भंडारे होते. प्रसंगी संस्थेचे गट निदेशक राजेंद्र मेश्राम व प्रदीप भांगे यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी प्रशिक्षनार्थी उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्यात जयंत जाधव, राम नंदुरकर, कु. रेणू ठाकरे, प्रशांत चव्हाण, योगेश राठोड, मंगेश भोयर, फैजान खान, अभिजीत अष्टेकर, प्रणव बनसोड, रोशन जाधव, मयूर धामणकर, निखिल शेंडे, चेतन हाडके, सोपान गायकी, मिथुन जाधव, आकाश मेश्राम, शिवम इंगोले, आशिष मेश्राम, अभय तायडे, अमोल काळे, आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन सचिन पांडे आभार जे. एस. वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेतील कर्मचारी व सर्व शिल्प निर्देशक यांनी प्रयत्न केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे ऑक्सीजन प्लांट ट्रेनिंग संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
