सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (३० सप्टें.) : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ देशमुख मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या विद्यार्थी तालुका प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते व गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव भाऊ राठोड यांची निवड करण्यात आली.
किनवट - माहूर विधानसभा प्रमुख सतिशभाऊ बोंतावार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
या वेळी किनवट - माहूर विधानसभा सचिव शिवचरण भाऊ राठोड, किनवट संपर्क प्रमुख पप्पु सातपूते, वसंत राठोड, मारोती शिरंडे उपस्थित होते. निवडीबदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या विद्यार्थी तालुका प्रमुख पदी वासुदेव राठोड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2021
Rating:
