करंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानीची आमदार अशोक उईके यांनी केली पाहणी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवढा, (३० सप्टें.) : राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा.डॉ अशोक उईके यांनी दिनांक ३० सप्टेंबर गुरुवार ला करंजी परिसराचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पिकांची झालेली नासाडी पाहून शेतकरी हवालदिल होण्याची भीती आमदार अशोक उईके यांनी व्यक्त केली.आपण महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे रुंझा.करंजी. परिसरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांच्या पावसाने वैतागला आहे. कपाशीचे बोंड सडलेली आहे. सोयाबीनचे पीक गेलेले आहेत.ज्या पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसते तीच पिके उध्वस्त झाल्याने आता करावे काय हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिलेला आहे. हा परिसर राळेगाव मतदार संघाच्या आवाक्यात आहे.मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ही जबाबदारी आहे.असे आमदार उईके म्हणाले त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः हा शेतात जाऊन त्यांच्याशी हितगुज केली यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ही परिस्थिती पाहून उईके यांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे ओल्या दुष्काळाची मागणी आपण करणार असल्याचे सांगितले. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे आजच्या काळात गरजेचे आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. आणि शेतकऱ्यांवरच जर मरणासन्न परिस्थिती आली तर तुम्हा आम्हाला जगणे कथन जाईल असे मत व्यक्त केले. मी तुमच्या सोबत आहो घाबरून जाऊ नका असा धीरही शेतकऱ्यांना आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी दिला शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी करतांना आमदार प्रा. डॉअशोक उईके याच्या सोबत पांढरकवडा तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी चव्हाण, सभापती राजेश पसलावार, माजी सभापतीं पंकज तोडसाम, विनोद बोरतवार, विलास बनकर, महादेव ठाकरे, मोहन बंडेवार, मारोती ठाकरे,
बाळा मानकर, तुळशीराम चव्हाण सचिन मडावी आकाश राठोड, परिसरातील शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
करंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानीची आमदार अशोक उईके यांनी केली पाहणी करंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानीची आमदार अशोक उईके यांनी केली पाहणी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.