सामाजिक बांधिलकीतून उमेश पोद्दार व अजिंक्य शेंडे यांचा "जाधव" कुटूंबियांना मदतीचा हात

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२३ सप्टें.) : समाजाला मदत करणे नैतिक कर्तव्य आहे, या सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून उमेश पोद्दार व अजिंक्य शेंडे विविध पातळ्यांवर मदत करत आहेत.

मागील आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस व वादळी वारे या मूळे वणी शहरातील अमृत भवन जवळ असलेल्या कविता अमोल जाधव या कुटूंबाचे आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उदरनिर्वाहचे साधन हिरावून गेल्याने जाधव कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. त्या नैसगर्गिक आपत्ती ग्रस्त कुटूंब अत्यंत हलाखीची परिस्थिती जिवन जगत असतांना अश्या परिस्थितीत शहरातील सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांनी आपला मित्र युवासेना चे उपजिल्हा प्रमूख अजिंक्य शेंडे यांच्या मदतीने जाधव कुटूंबियांना मदतीचा हात दिला. त्यांच्या घरी जावून त्यांना आर्थिक रोख रक्कम व साडीचोळी देवून सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून जवाबदारी पार पाडली.

यावेळी तात्याजी जाधव, वैशाली तायडे, अल्का जाधव, वंदना बागळदे, सोनू शिंदे, विजया खडसे आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीतून उमेश पोद्दार व अजिंक्य शेंडे यांचा "जाधव" कुटूंबियांना मदतीचा हात सामाजिक बांधिलकीतून उमेश पोद्दार व अजिंक्य शेंडे यांचा "जाधव" कुटूंबियांना मदतीचा हात Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.