सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४सप्टें.) : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी जरी उठली तरी ग्रामीण भागात आज ही अवैध दारुचा व्यवसाय अद्याप सुरु असल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे.
अश्यातच पाेलिसांनी चिमूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या वडसी येथील सुनिल मेश्राम यांस नुकतीच अटक केली असुन, त्याचे कडुन अंदाजे दाेन हजार रुपयांची देशी दारु जप्त केली तर दुस-या एका प्रकरणात चिमूर येथे पवन मांडवकर यांस पाेलिसांनी ताब्यात घेतल्याचे व्रूत्त आहे. पवन याचे कडुन ३३००/- रुपये किंमतीची अवैध दारु पाेलिसांनी हस्तगत केल्याचे समजते. सदरहु दाेन्ही कारवाया पाेलिस निरीक्षक मनाेज गभने यांचे मार्गदर्शनाखाली पाेलिस पथकांनी केल्या आहे.
जिवती तालुक्यात आज ही काही भागात अवैधरित्या हातभट्ट्यांची दारु खुलेआम विकल्या जात असल्याचे वृत्त असुन, पाेलिस प्रशासनाने त्या कडे ही लक्ष पुरवावे अशी जनतेची मागणी आहे.
अवैध दारु विक्री प्रकरण : दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 24, 2021
Rating:
