सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (२० ऑगस्ट) : अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन मध्ये अनिल बंडप्पा मुळे हे पी.एस.आय. वर्ग दोनच्या पदावर कार्यरत होते. दि.13/08/2021 रोजी त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजले. सदरील प्रकरण हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देवून त्यांची वेतनवाढ रोखून बदलीला अडथळा निर्माण केला व आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर जाऊन त्यांचे लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले. त्यातील सर्व पुरावे नष्ट करून लॅपटॉपशी छेडछाड करण्यात आली. त्यांच्या मोबाईलची सर्व माहिती व सीडीआर तपासावे. अशी लिंगायत समाजाची मागणी आहे.
सदरील घटना अत्यंत दुर्दैवी असून एका कर्तव्यदक्ष तरुण पोलिस अधिका-यांचा वरिष्ठाच्या जाचाने अंत झाला आहे. त्यांच्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याची ऑडीयो क्लीप ही वायरल झालेली आहे. जाणीवपुर्वक त्रास देऊन आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठ अधिका-यांची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषी अधिकार्यावर कार्यवाही करुन मृत अनिल मुळे यांच्या पत्नी व दोन लहाण मुलांना न्याय मिळवून द्यावा व तसेच त्यांच्या कुटुबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे. अशी विनंती सर्व समाज बांधव आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी ,पोलीस ठाणे बिलोली यांना करण्यात आली.
यावेळी बाबाराव पा भाले, शंकर महाजन, शिवराज बामणे, महेश हांडे, सदाशिव बोडके, कृष्णा पाटील भोसीकर, मनोहर वसमते, शिवा शिवशट्टे, कमलाकर जमदाडे, व्यंकट कु-हे, अभिजीत धरमुरे, गणेश नागनगे, गजानन पाटील, शुभम कनशट्टे, अमोल पाटील, सुनिल चिलनोड, सुनिल खिरप्पावार, बालाजी बामने, ओम कोरे, ओम भाले, सुरेश बेटमोगरे, नागनाथ शेटकर, शिवाजी लिमशट्टे, तिप्पाजी नागेश, आलेबल्ले व्यंकट, आदी समाजातील बांधवांची उपस्थिती होती, दिलेल्या निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पो.उप.नि. अनिल मुळे यांच्या मृत्यूची CBI चौकशी करा व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकिय सेवेत घ्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 20, 2021
Rating:
