सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे, (२० ऑगस्ट) : बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारा तसेच विश्वासाचे अतुट नाते जपणारा 'रक्षाबंधन' सण येत्या २२ ऑगष्टला हाेवू घातला असुन, या निमित्ताने पुणेसह शिरूर तालुक्यातील गावातील दुकाने विविध आकर्षक व मनाेवेधक राख्यांनी तथा रेशीम धाग्यांनी सजली असल्याचे या शहरात दृष्टीक्षेपात पडले. गत वर्षी काेराेनाचे सावट, या ही वर्षी काेराेनाचे सावट असतांना व्यापाऱ्यांनी आवश्यक तेवढ्याच विविध रंगाच्या राख्यां विक्रीसाठी आणल्या आहे. दरम्यान, आतापासूनच बाहेर गावी राख्या पाठविण्यासाठी महिलांमंडळींनी व तरुणींनी राखी खरेदी करणे लगबग सुरु झाले असल्याचे एका छाेट्या विक्रेत्यांने आमच्या प्रतिनिधीस सांगितले. एका राखीचा दर ५ ते २०० रुपयांपर्यत असल्याचे ताे म्हणाला. या वर्षी सर्वाधिक राख्या मुंबई, मलाड मार्केट, अहमदाबाद, कानपुर वरुन आल्या आहे. तसेच बच्चे कंपनीसाठी खेळणी स्वरुपाच्या राख्या माेठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असुन, ऑगस्टपासून बाजारपेठत महिलां मंडळी ची गर्दी वाढली असल्याचे दिसून येते.
राख्यांची मनमोहक सजावट वेधत आहे बघीणींचे लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 20, 2021
Rating:
