सह्याद्री न्यूज नेटवर्क |
पाटण, (१९ ऑगस्ट) : जनसेवा मंडळ पाटणबोरी द्वारा संचालित श्री शिव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी स्वतः राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एक स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे.
देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आत्मीयतेची भावना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी या अनुषंगाने विद्यालयातील विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या घरी तयार करून त्या विद्यालयात एकत्रित केल्या. त्या संपूर्ण राख्यांचे एकत्रीकरण करुण विद्यालयातर्फे या राख्या सैनिकांना पाठविण्यात आलेल्या आहे. यासाठी या उपक्रमाचे संयोजक सचिन जोशी यांनी परिश्रम घेतले. त्यांना या कामासाठी विद्यालयातील शिक्षिका शिल्पा पत्की आणि संगीता वानखेडे यांचे सहकार्य लाभले. १५ ऑगस्टला झालेल्या एका कार्यक्रमात मुख्याध्यापक देवानंद येरकडे यांच्याकडे या राख्या सुपूर्द करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला गुणवंत केमेकार, अविनाश सरोदे, श्रीकांत पांडे, अरुण जिड्डेवार, नीता नरांजे, विलास जिड्डेवार, रितेश कुसनेनिवार, नवनीत गोपीडवार, आनंद गाडे, आनंद वैद्य, वसंत सिंगेवार, संतोष बोळकुंटवार आदी उपस्थित होते. विद्यालयातील माजी विद्यार्थी स्वप्नील मोहिजे हा लेह लद्दाख मध्ये सैनिक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यापर्यंत या राख्या पोचवण्यात आलेल्या आहेत.
विद्यालयात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात यावर्षी कोरोणाचे सर्व नियम पाळून आम्ही विद्यार्थ्यांना सैनिकांसाठी राखी पाठवण्याचे आवाहन केले होते. यासाठी तिरंगा, भारत माता, भारत देश अशा प्रकारचे विषय राखी बनवण्यासाठी दिले होते. त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
- सचिन अरुण जोशी
प्रभारी शिक्षक
श्री शिव छत्रपती विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
