सह्याद्री न्यूज नेटवर्क |
यवतमाळ, (१९ ऑगस्ट) : बिरसा क्रांती दला च्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील पंचेचाळीस जमातीतील परिवर्तनशील युवक व जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटित करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटित करण्याची धारणा खालील वाक्यामुळे अधिक दृढ होते.
"स्वावलंबनाचा स्वीकार ही सर्वश्रेष्ठ गोष्ट असते" आणि आत्मसन्मानाचे आंदोलन स्वावलंबना शिवाय चालूच शकत नाही. भारतीय समाजव्यवस्थेत सर्वात शोषित,पीडित हा आदिवासी समाज आहे. आणि म्हणूनच या उच्च व्यवस्थेचा जो समाज अधिक शिकार झाला आहे त्या समाजाने आपल्या या झालेल्या दुर्दशेत सुधारणा करण्यासाठी आणि आपल्यासोबत होत असलेल्या अन्यायाचा समूळ नाश करण्यासाठी स्वतः स्वतःला एका सूत्रात बांधून घेतली पाहिजे.
आपले संविधान सुद्धा या सत्याचा स्वीकार करते आहे की, आदिवासी समाजावर अनंत काळापासून अन्याय होत आहे. या ऐतिहासिक सत्याला लक्षात घेऊन आपल्या संविधानात आदिवासी समुदायांचे अधिकार व हीत सुरक्षित ठेवण्यासाठी काही प्रावधान केले आहे. संविधानात जरी हे केले असले तरी सरकार यावर योग्य अंमल करेल की नाही या गोष्टीवर सर्वस्वी अवलंबून आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला आपल्या हिताची व अधिकाराची रक्षा करण्यास स्वतः संघटित होणे अनिवार्य आहे. या महत्त्वाच्या कामासाठी आरक्षणामुळे लाभान्वित झालेला आदिवासी समाजातील कर्मचारी वर्ग अत्यंत उपयुक्त आहे .
सामाजिक, आर्थिक, शोषणाच्या विरुद्ध भारताच्या अनेक प्रांतात आदिवासी जमातींची त्या त्या भूभागात आंदोलने झाली. ती सगळी आंदोलने आत्मसन्मानाची होती. तत्कालीन लढ्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी जमातीकडे आधुनिक हत्यारे नव्हती. परंतु "स्वाभिमानी बारूद" सर्वांच्याच उरात धगधगत होती,म्हणून परकीय आक्रमणांच्या आणि प्रसंगी स्वदेशी शोषकांच्या विरोधात आदिवासी आक्रमक पणे उभा राहिला. परंतु सत्य इतिहास आमच्या समोर आला नाही. असे प्रतिपादन दसरथ जी मडावी यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. रंगरारावजी काळे, (अध्यक्ष बिरसा क्रांती दल महा.राज्य.) डी.बी.अंबुरे (राज्य उपाध्यक्ष) नारायणराव पिलवंड, (राज्य प्रशिक्षक) अनिल पेंदोर (जिल्हा उपाध्यक्ष) तसेच या, प्रशिक्षण वर्गाला ला पुसद चे डॉक्टर गणेश वानोळे, डॉक्टर नारायणराव पठाडे आर्णी येथून निलेश उकंडे, ढगे रामेश्वर, दारव्हा येथुन बाबाराव होलगरे, ज्ञानेश्वर तडसे, उमरखेड रवी भुसारे, शांतीदास खोकले, संजयअंबोरे, तर दि दिग्रस येथून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता.
बिरसा क्रांती दल उपाध्यक्ष अनिल पेंदोर
तालुकाध्यक्ष संगीत पवार, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर पेंदोर, सचिव मधुकर मडावी, नगरसेवक वसंतराव मडावी, गोपाल पवार, व्यंकटेश मडावी, प्रज्वल पवार, गजानन सुकळकर, संदीप देवकते, महादेव पिंपळे, अशोक ठाकरे, सावन पवार, रवी पवार, गजानन पवार, यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षित तरुणच परिवर्तनाची लढाई लढू शकतात - दशरथजी मडावी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2021
Rating:
