सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापूर, (१९ ऑगस्ट) : दि. १७ ऑगस्ट ला अन्नक्षेत्र फाउंडेशन थेट नागपूर ते तातापुर (पोड) इथे प्रोटीन, ज्यूस व खाऊचे संपूर्ण गावात वाटप करण्यात आले.पांढरकवड्या वरून काही अंतरावर असलेलं तातापूर व तातापुर (पोड) येथे विदर्भातील सामाजिक संघटना चांगुलपणाचा चळवळीच्या प्रणेत्या व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा पुरोहित, पांढरकवडा चे प्रतिष्ठित व्यक्ती दत्ता सिडाम, भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष व भाजपा मच्छीमार सेल चे जिल्हा महामंत्री प्रदिप ना.भनारकर, कैलास भनारकर, रोशन मसराम, आकाश वहिले यांचे स्वागत तातापूर येथील पोलिस पाटील मारोती अत्राम, उपसरपंच आर्जुन करलुके, भाजपा युवा मोर्चा चे शाखा अध्यक्ष हर्ष भोयर, उपाअध्यक्ष सचिन करलुके यांच्या सहकार्याने तातापूर (पोड) येथे करण्यात आले. यावेळी अरुणा पुरोहित यांनी आदिवासी व भोई समाजांच्या लोकांना शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, नोकरी कशा प्रकारे करता येईल व आम्ही आपल्याला रोजगार उपलब्ध करून दिला तर आपण त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती केली तसेच आम्ही आश्वासन देत नाही. परंतु आम्ही प्रयत्नशिल आहोत असे मत व्यक्त केले.
यावेळी चर्चा करतांना भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप भनारकर म्हणालेत की, ग्रामीण भागात समस्या अनेक आहेत व आदिवासी कलागुणांना एक हक्काचे स्थान व त्याच्यातून मिळणारा रोजगार त्या आदिवासी बांधवांना नवी चालना मिळेल असे मत व्यक्त केले. पाहुण्याचे स्वागत आणि आभार तातापूर गावकरी यांच्या वतीने भाजपा शाखा अध्यक्ष हर्ष भोयर, उपसरपंच अर्जुन करलुके, पोलिस पाटील मारोती आत्राम यांनी मानले.