सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
नांदेड, (१९ ऑगस्ट) : बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील रहिवासी लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार बसवराज वाघमारे यांचे आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
वाघमारे यांना बिलोलीहून नांदेड येथे उपचाराकरिता घेऊन जात असतांना कासराळी जवळ त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने पत्रकार बांधवांमध्ये हळहळ व्यक्त आहे. अतिशय मनमिळावू असे व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांच्या अचानक निघून जाण्याने वाघमारे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. बिलोली तालुक्यातील सर्व पत्रकार व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. त्यांचा अंत्यविधी बोळेगाव येथील त्यांच्या राहत्या गावी ठिक ०५: ०० वाजता करण्यात आला आहे.