संजय वानखेडे यांची गट विकास अधिकारी पदी नियुक्ती



सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (११ ऑगस्ट) : पं.स. मारेगाव येथील गट विकास अधिकारी नाल्हे हे सेवानिवृत्त झाले असून, गट विकास अधिकारी म्हणून संजय वानखेडे हे नुकतेच त्या जागी रुजु झाले असून, त्यांनी पंचायत समिती चा कार्यभार हाती घेतला आहे. 

डॉ. मनोहर नाल्हे हे गट विकास अधिकारी पदावरून सेवानिवृत झाल्याने पंचायत समिती मध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संजय वानखेडे यांची गट विकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदावर रुजु होताच, वानखेडे यांनी पंचायत समिती विभागातील कामाचा आढावा घेतला. त्या आढाव्यात आरोग्य, कृषी, शिक्षण, व बांधकाम विभागाबाबत काही अडचणी असल्यास त्या सोडवण्याच्या सुचना विभागवार अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. 
संजय वानखेडे यांची गट विकास अधिकारी पदी नियुक्ती संजय वानखेडे यांची गट विकास अधिकारी पदी नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on August 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.