टॉप बातम्या

जामणी येथे आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१० ऑगस्ट) : दिनांक ९ आगस्ट रोजी जामनी येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी गाव मध्ये प्रभात फेरी काढून विश्व  आदिवासी गौरव दिवस साजरा केला आहे.

धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व आपल्या महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचा संकल्प घेतला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळी व युवा वर्ग उपस्थीत होते.

या कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता महेश गेडाम यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी वासुदेव गेडाम, पुरुषोत्तम कोडापे, 
विनोद मेश्राम, प्रदीप कोडापे, संजय पुसाम, नृशिंह कोडापे, रुपेश गुरुनुले, हनुमान गाऊत्रे, केशव उटलावर यांनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post