मारेगाव येथील कब्रस्थान रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (१३ ऑगस्ट) : शहरातील कब्रस्थान ला जोडणारा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आज दि.१३ ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी शहरातील मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित नागरिक व नगर पंचायतचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून मारेगाव शहर येथील कब्रस्थान दफनविधी ला जाण्याची मोठी अडचण येत होती. ही समस्या लक्षात घेवून मुस्लिम समुदायांनी नगर पंचायत ला पक्का रस्त्याची मागणी केली. ही समस्या लक्षात घेत न.पं.चे मुख्याधिकारी मोकळ साहेब यांनी नगरपंचायत मार्फत नागरी सुविधा निधी अंतर्गत पाच लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर केला.

सदर रस्ता कोलगाव रोड ते कब्रस्तान, मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ६० मिटर अंतराचा असणार आहे. नगर पंचायत चे मुख्यधिकारी अरुण मोकळ, माजी आरोग्य सभापती खालिद पटेल, नोडल अधिकारी तथा अभियंता निखिल चव्हाण यांच्या हस्ते, भूमीपुजन सोहळा करण्यात आले. यावेळी अनेक मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. या पार पडलेल्या भूमिपूजन सोहळा, निमित्ताने मारेगाव कब्रस्तान कमिटीचे शरीफ अहेमद, शेख मोहम्मद भाई, शेख रसूल भाई, एड. मेहमूद खान, शेख खलील सिकंदर, सैय्यद अहेफाज, इरफान शेख, वाहिद भाई, दिलदार शेख, उमर शरीफ, शेख फरीद, तौसिफ कुरेशी सह शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मारेगाव नगर पंचायतचे मुख्यधिकारी अरुण मोकळ व स्थापत्य अभियंता निखिल चव्हाण यांचे आभार मानले.

मारेगाव येथील कब्रस्थान रस्त्याचे भूमिपूजन संपन्न मारेगाव येथील कब्रस्थान रस्त्याचे भूमिपूजन संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on August 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.