सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (१३ ऑगस्ट) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिवरा (संगम) येथे त्यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज हिवरा (संगम) येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौक येथे माजी सरपंच प्रवीण जामकर, डॉ. धोंडिराव बोरूळकर यांच्याहस्ते राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
हिवरा (संगम) येथील प्रतिष्ठित व्यापारी राजु खोंडे, राजेंद्र कदम, दयानंद लकडे, अरुण आंडगे, सुभाष आंडगे, दत्तराव मदने, दत्तराव आंडगे, सचिन बेलखेडे, राजु आंडगे, नितीन आंडगे, साहेबराव बेलखेडे, स्वप्नील बेलखेडे, राजु आंडगे, मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण, मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, मनसे शाखाध्यक्ष मुकुंद जामकर, अनिल मुडेवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस गजेंद्र जामकर, उपाध्यक्ष अमोल ठाकरे, नितीन आंडगे, शिवसेनेचे तालुका उपसंघटक किशोर घाटोळे, आधारस्तंभ साहेबराव पाटील मित्र परिवाराचे संजय सोनुने यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते.