संदीप भुरेंचे 'लई भारी स्वर संगीत' पोहोचले सातासमुद्रापलीकडे


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (१३ ऑगस्ट) : तालुक्यातील आदमपूर येथील युवा कवी, गीतकार, संगीतकार व गायक प्रा.संदीपभुरे आदमपूरकर यांचे नुकतेच 'कवी श्रीराम घडे प्रस्तुत मराठी गौरव गीत' थाटामाटात रिलीज झाले आहे. नुकत्याच टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भालाफेक क्रिडा प्रकारात भारताला' सुवर्णपदक' मिळवून देणाऱ्या 'गोल्डन बाॅय' नीरज चोप्रा या खेळाडूच्या अदम्य इच्छा शक्ती आणि धैर्य, चिकाटी ह्या गुणांवर हे गीत आधारित आहे. सदरील गौरव गीताचे गीतकार सर्जेराव पाटील कौलवकर
 (ऑस्ट्रेलिया) हे असून, गायक आणि संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर हे आहेत. 
ध्वनीमुद्रक प्रकाश माने (मुंबई) तर व्हिडिओ ग्राफिक्स आशिष चव्हाण आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमित हे मराठी गीत जाऊन पोहोचल्याचा 'लई भारी' आनंद आहेच!

आजवर असंख्य शब्द कळांना आपल्या आगळ्या वेगळ्या स्वर संगीताने संदीप भुरेंनी योग्य न्याय दिलेला आहे. अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानितही करण्यात आलेलं आहे. अतिशय बिकट परिस्थितीत संगीत साधना करत अख्या महाराष्ट्रात ते संगीतकार म्हणून नावारूपाला आलेले आहेत. बाॅलिवूड मधील सिने पार्श्वगायक सुरेश वाडकर, वैशाली माडे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, नेहा राजपाल, अजित कडकडे, उत्तरा केळकर, मोहम्मद अयाज, सुप्रिया सोरटे, संघपाल तायडे, संजय सावंत, शकुंतला जाधव इत्यादी नामवंत गायकांना संदीप ने गाऊन घेतलेले आहे. आगामी काही मराठी चिञपट सुद्धा संदीपच्या संगीताने नटलेले येत आहेत, हीच यशाची पावती म्हणावी लागेल!

आपण जीवापाड जपलेली कला वरचेवर अधिक प्रगल्भ आणि नाविन्यपूर्ण व्हावी यासाठी शुभेच्छारूपी वर्षाव संदीपवर होत आहे. सबंध महाराष्ट्रातून संदीप भुरेंच्या खडतर वाटचालीचे कौतुक होत आहे.निर्माता प्रशांत शिंगटे साहेब व रणजीत जाधव शितल कुमार माने, मोहम्मद अयाज, ए.पी.आय पंकज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, जाफर आदमपूरकर, प्रा.सुनिल भुरे कपिल भुरे, पत्रकार राजेंद्र कांबळे, शेख इलियास, सय्यद रियाज, ए.जी कुरेशी, सुनिल कदम ,सुनिल जेठे, काशीनाथ वाघमारे आदिंनी अभिनंदन केले आहे.
संदीप भुरेंचे 'लई भारी स्वर संगीत' पोहोचले सातासमुद्रापलीकडे संदीप भुरेंचे 'लई भारी स्वर संगीत' पोहोचले सातासमुद्रापलीकडे Reviewed by सह्याद्री चौफेर on August 13, 2021 Rating: 5
Powered by Blogger.